एकटेपणा
एकटेपणा
पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते ...
चांदण्यांची साथ आज मिळालीच नाही ....
आयुष्याच्या वाटेवर एकटीच चालत होते ,,,
सोबतीची चाहूल कधी जाणवलीच नाही .....
मागे वळून पाहताना सोबत फक्त पाऊलेच होती ....
आठवणी तर सुखद कधी वाटल्याचं नाहीत
एकांत हवा होता जीवनात
एकटेपणा कधी झाला कळलंच नाही ....
पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते ....
आज सागराच्या लाटा सुद्धा सांगत आहेत त्यांच्या मिलनाची कहाणी .....
पण विरहाची भीती मनातून जातच नाही .....
पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते
हरवलेल्या मनात आज मी काहीतरी शोधत होते
पण अश्रुंशिवाय दुसरं काही मिळालंच नाही ....
जीवनाच्या वाटचालीत सफल वाट मिळावी असे वाटत होते
टोचणाऱ्या नजरांशिवाय काही मिळालंच नाही ...
पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते .....
Comments
Post a Comment