Posts

आठवणी...

  आठवणी आठवणी त्या तुझ्या आणि माझ्या आठवणी त्या बागेतल्या आठवणी त्या वेळेच्या सोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी त्या दुःखाच्या आठवणी त्या सुखाच्या आठवणी त्या तुझ्या आणि माझ्या बाबा सांगायचे नेहमी अनमोल असतात या आठवणी ज्या फक्त आठवतात कधी हसवतात तर कधी रडवतात तरीही सोबतच असतात आठवणी त्या तुझ्या आणि माझ्या आठवत का ग आई , गावी जायला आपण केली होती खूप घाई मग आठवलं , एक गोष्ट राहिलीच मेन तू झालीस खूपच बेचैन विसरलो होतो बॅग सामानाची वेळच आली पंचायतीची अजूनही आठवत ते मला अन हसू येते कितीही विसरायचा प्रयत्न केला ना तरी हि आठवण मात्र मनात घर करून जाते आठवणी त्या तुझ्या आणि माझ्या समुद्र किनाऱ्यावर बसले होते निवांत तेथे खूप होता एकांत तरीही एकजण माझ्या मनात येत होती देत होती मला नकळत त्रास आजूबाजूला आहे ती असा होत होता भास नंतर समजलं त्रास देणारी आठवण होती तिचा त्रास सुखद होता नकळत थोडा दुःखद होता आठवणी त्या तुझ्या आणि माझ्या एकांतात एकटेपणा वाटून न देणारी आठवण अजूनही तशीच आहे सुखातही हळूच डोकावून दुःखाची चाहूल देणारी आठवण अजूनही तशीच आहे ती मी विसरु शकत नाही आणि ती मला विसरूही देणार नाही अश...

कोणाला माहीत होते

  कोणाला माहीत होते की जग इतका बदलेल जगाच्या या मायेत कधीतरी मी पण हरवेल कोणाला माहीत होते की कोणीतरी येईल आयुष्यात आणि हळूच घर करून जाईल मनात कोणाला माहीत होते तू इतका माझ्यात गुंतशील नेहमी तर नजरेत बोलायचास आता शब्दानी मन जिंकाशिल कोणाला माहीत होते तुझ्या त्या स्पर्शाने हळूच हरवेल मी तुझ्यात तू आणि मी या शिवाय कोणीच नसावे जगात कोणाला माहीत होते माहित असणे किंवा नसणे या गोष्टी वेगळ्या बोलून सर्व काही वाटा झाल्या आता मोकळ्या खुल्या नजरेचे इशारे आता मन जिंकत होते तुझ्या स्पर्शामधे माझे ह्रदय अडकत होते होता होता क्षण सरकत सरकले वाटा चुकल्या रस्ते भरकटले कोणाला माहीत होते वाटा भरकटल्या तरी तू तेथेच होतास बोलावत होतास मला का जाणे माझे पाउल पुढे गेले नाही… तुझ्या त्या मनात मला पुन्हा येऊन दिले नाही पण तुझ्यावर विश्वास होता खुप तू नेशिलच मला मन जिंकण्याची अवगतच आहे तुला कला कोणाला माहीत असो किंवा नसों मला माहीत होते … की तू माझा अन मी तुझीच फ़क्त जगाला दाखवायचे होते

मना कठोर बनव मला

  मना कठोर बनव मला ताकद देऊ नकोस पण हिम्मत दे कठीण स्थितीचा सामना करण्याची शक्ती देऊ नकोस पण युक्ती दे शत्रूवर मात करण्याची मना कठोर बनव मला साहस दे अपरात्री वाटेवर निर्भय चालण्याचे धाडस दे या जगाला माझे अस्तित्व दाखवण्याचे फक्त एकच हात दे मना , तुझ्या मदतीचा एक दिवस येईलच माझ्या प्रगतीचा हरेन मी पण झुकणार नाही रडेन मी पण सहानुभूती घेणार नाही शरीराने नाही तर मनाने कठोर असेन त्याच वेळी मी खरी जिंकलेली असेन मना कठोर बनव मला साथ दे माझ्या परिवाराची माझे हे अश्रू माझ्या डोळ्यांतून बाहेर येणार नाहीत बस इतकाच हवय मला मना , मला कठोर बनवायचंय तुला नाही घेणार कोणीही माझा फायदा नाही देणार कोणीही मला त्रास नाही पाडणार कोणीही मला खाली नाही करणार माझा कोणीही भंग इतकी कठोर असेन मी जेव्हा वाईटपणा तितकाच दूर असेल माझ्यापासून तेव्हा ताकद नको मला पण हिम्मत दे शक्ती नको मला पण युक्ती दे नाजूकपणा नको मला पण कठोरता दे

सुखाच्या शोधात...

  सुखाच्या शोधात आज मी हरवले आहे .... त्या मायावी जंगलात ... जिथे असतात अनोळखी माणसे .... सुखाच्या शोधात .... आज मी गुंतले आहे..... त्या निरर्थक जगण्यात ... जिथे माणसांची किंमत मोजतात कागदी पैसे ... सुखाच्या शोधात .... आज मी मोहित झाले आहे ... त्या निर्जीव वस्तूंना ज्यांची सजीवांपेक्षाही असते खूप गरज... सुखाच्या शोधात ... आज मी समजावते आहे... त्या मनाला .... ज्याला कळत नाही खऱ्या अन खोट्याचा फरक.... सुखाच्या शोधात.... आज मी घाबरले आहे ... त्या भयावह चेहऱ्यांना .... ज्यांमधून येते फक्त स्वार्थाची दुर्गंधी.... सुखाच्या शोधात ... आज मी प्रयत्न करते आहे ... त्या माणसांपासून वाचण्याचा... ज्यांनी चढवली आहे चांगुलपणाची मुखवटी.... सुखाच्या शोधात ... आज मी तडफडते आहे... त्या मोकळ्या श्वासासाठी ... ज्याची अपेक्षाही करणं आहे मोठी चूक सुखाच्या शोधात आज मी हसत आहे माझ्या त्या मूर्खपणावर ... ज्याची काढली होती मी समजूत.... सुखाच्या शोधात.... आज मी गमावले आहे .... त्या आयुष्याला .. ज्यासाठी मी केली एवढी धडपड... सुखाच्या शोधात.... आज मी दमले आहे... त्याच सुखाच्या शोधात... जे नाही मिळणार कधीच याची व...

हे नेहमी असेच असावे...

       तू आहेस म्हणून आहे मी ... तुझ्या डोळ्यात फक्त माझा चेहरा दिसणं तुझ्या हातात फक्त माझा हात असणं तुझ्या श्वासात फक्त माझा सुगंध पसरणं हे नेहमी असेच असावे माझ्या एकाच नजरेने तुझे घायाळ होणं काही कारण नसताना आपल्यात होणारी गोड भांडणं माझे पाणावलेले डोळे बघून तुझं ते हळूच भावूक होणं हे नेहमी असेच असावे समुद्र किनारी तास न् तास गप्पा मारणं माझ्या हळुवार स्पर्शा मधे तुझं हरवून जाणं थंड हवेची झुळूक येता तुझं ते एकटक माझ्याकडे पाहणं हे नेहमी असेच असावे तुझं ते शुल्लक गोष्टीवरून चिढणं माझं ते तुला समजून घेणं मग हळूच एकमेकांकडे बघून सगळ काही डोळ ‌ ्यातच बोलणं हे नेहमी असेच असावे

एकटेपणा

  एकटेपणा   पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते ... चांदण्यांची साथ आज मिळालीच नाही .... आयुष्याच्या वाटेवर एकटीच चालत होते ,,, सोबतीची चाहूल कधी जाणवलीच नाही .....   मागे वळून पाहताना सोबत फक्त पाऊलेच होती .... आठवणी तर सुखद कधी वाटल्याचं नाहीत एकांत हवा होता जीवनात एकटेपणा कधी झाला कळलंच नाही .... पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते ....   आज सागराच्या लाटा सुद्धा सांगत आहेत त्यांच्या मिलनाची कहाणी ..... पण विरहाची भीती मनातून जातच नाही ..... पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते   हरवलेल्या मनात आज मी काहीतरी शोधत होते पण अश्रुंशिवाय दुसरं काही मिळालंच नाही .... जीवनाच्या वाटचालीत सफल वाट मिळावी असे वाटत होते टोचणाऱ्या नजरांशिवाय काही मिळालंच नाही ... पाहताना आभाळात आज मी एकटीच बसले होते .....