मना कठोर बनव मला

 

मना कठोर बनव मला
ताकद देऊ नकोस पण
हिम्मत दे कठीण स्थितीचा सामना करण्याची
शक्ती देऊ नकोस पण
युक्ती दे शत्रूवर मात करण्याची


मना कठोर बनव मला
साहस दे अपरात्री वाटेवर निर्भय चालण्याचे
धाडस दे या जगाला माझे अस्तित्व दाखवण्याचे
फक्त एकच हात दे मना , तुझ्या मदतीचा
एक दिवस येईलच माझ्या प्रगतीचा


हरेन मी पण झुकणार नाही
रडेन मी पण सहानुभूती घेणार नाही
शरीराने नाही तर मनाने कठोर असेन
त्याच वेळी मी खरी जिंकलेली असेन


मना कठोर बनव मला
साथ दे माझ्या परिवाराची
माझे हे अश्रू माझ्या डोळ्यांतून बाहेर येणार नाहीत
बस इतकाच हवय मला
मना , मला कठोर बनवायचंय तुला


नाही घेणार कोणीही माझा फायदा
नाही देणार कोणीही मला त्रास
नाही पाडणार कोणीही मला खाली
नाही करणार माझा कोणीही भंग
इतकी कठोर असेन मी जेव्हा
वाईटपणा तितकाच दूर असेल माझ्यापासून तेव्हा


ताकद नको मला
पण हिम्मत दे
शक्ती नको मला
पण युक्ती दे
नाजूकपणा नको मला
पण कठोरता दे

Comments