सुखाच्या शोधात...
सुखाच्या शोधात
आज मी हरवले आहे ....
त्या मायावी जंगलात ...
जिथे असतात अनोळखी माणसे ....
सुखाच्या शोधात ....
आज मी गुंतले आहे.....
त्या निरर्थक जगण्यात ...
जिथे माणसांची किंमत मोजतात कागदी पैसे ...
सुखाच्या शोधात ....
आज मी मोहित झाले आहे ...
त्या निर्जीव वस्तूंना
ज्यांची सजीवांपेक्षाही असते खूप गरज...
सुखाच्या शोधात ...
आज मी समजावते आहे...
त्या मनाला ....
ज्याला कळत नाही खऱ्या अन खोट्याचा फरक....
सुखाच्या शोधात....
आज मी घाबरले आहे ...
त्या भयावह चेहऱ्यांना ....
ज्यांमधून येते फक्त स्वार्थाची दुर्गंधी....
सुखाच्या शोधात ...
आज मी प्रयत्न करते आहे ...
त्या माणसांपासून वाचण्याचा...
ज्यांनी चढवली आहे चांगुलपणाची मुखवटी....
सुखाच्या शोधात ...
आज मी तडफडते आहे...
त्या मोकळ्या श्वासासाठी ...
ज्याची अपेक्षाही करणं आहे मोठी चूक
सुखाच्या शोधात
आज मी हसत आहे
माझ्या त्या मूर्खपणावर ...
ज्याची काढली होती मी समजूत....
सुखाच्या शोधात....
आज मी गमावले आहे ....
त्या आयुष्याला ..
ज्यासाठी मी केली एवढी धडपड...
सुखाच्या शोधात....
आज मी दमले आहे...
त्याच सुखाच्या शोधात...
जे नाही मिळणार कधीच याची वाटते आहे हळहळ...
सुखाच्या शोधात...
आज मी सुद्धा हरवले आहे...
या मायावी जंगलात...
जिथे हरवली आहेत अनेक माणसे...
सुखाच्या शोधात ..
आज मी सुद्धा गुंतले आहे..
जिथे माणसांची किंमत मोजतात कागदी पैसे .....
Comments
Post a Comment