हे नेहमी असेच असावे...
तू
आहेस म्हणून आहे मी...
तुझ्या डोळ्यात फक्त माझा चेहरा दिसणं
तुझ्या हातात फक्त माझा हात असणं
तुझ्या श्वासात फक्त माझा सुगंध पसरणं
हे नेहमी असेच असावे
माझ्या एकाच नजरेने तुझे घायाळ होणं
काही कारण नसताना
आपल्यात होणारी गोड भांडणं
माझे पाणावलेले डोळे बघून तुझं ते हळूच भावूक होणं
हे नेहमी असेच असावे
समुद्र किनारी तास न् तास गप्पा मारणं
माझ्या हळुवार स्पर्शा मधे तुझं हरवून जाणं
थंड हवेची झुळूक येता तुझं ते
एकटक माझ्याकडे पाहणं
हे नेहमी असेच असावे
तुझं ते शुल्लक गोष्टीवरून चिढणं
माझं ते तुला समजून घेणं
मग हळूच एकमेकांकडे बघून
सगळ काही डोळ्यातच बोलणं
हे नेहमी असेच असावे
Comments
Post a Comment