कोणाला माहीत होते
कोणाला माहीत होते
की जग इतका बदलेल
जगाच्या या मायेत कधीतरी मी पण हरवेल
कोणाला माहीत होते की
कोणीतरी येईल आयुष्यात
आणि हळूच घर करून जाईल मनात
कोणाला माहीत होते
तू इतका माझ्यात गुंतशील
नेहमी तर नजरेत बोलायचास
आता शब्दानी मन जिंकाशिल
कोणाला माहीत होते
तुझ्या त्या स्पर्शाने हळूच हरवेल मी तुझ्यात
तू आणि मी या शिवाय कोणीच नसावे जगात
कोणाला माहीत होते
माहित असणे किंवा नसणे या गोष्टी वेगळ्या
बोलून सर्व काही वाटा झाल्या आता मोकळ्या
खुल्या नजरेचे इशारे आता मन जिंकत होते
तुझ्या स्पर्शामधे माझे ह्रदय अडकत होते
होता होता क्षण सरकत सरकले
वाटा चुकल्या रस्ते भरकटले
कोणाला माहीत होते
वाटा भरकटल्या तरी तू तेथेच होतास
बोलावत होतास मला
का जाणे माझे पाउल पुढे गेले नाही…
तुझ्या त्या मनात मला पुन्हा येऊन दिले नाही
पण तुझ्यावर विश्वास होता खुप
तू नेशिलच मला
मन जिंकण्याची अवगतच आहे तुला कला
कोणाला माहीत असो किंवा नसों
मला माहीत होते …
की तू माझा अन मी तुझीच
फ़क्त जगाला दाखवायचे होते
Comments
Post a Comment